जम्मू काश्मीर मधल्या दुर्बल घटकातल्या ग्रामीण कुटुंबाना प्रोत्साहन

नवी दिल्ली, दि.२० – दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी जम्मू-काश्मीर मधे 2018-19 मधे आणखी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जम्मू काश्मीरसाठी या योजने अंतर्गत विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी दारिद्रय रेषेशी न जोडता गरजेनुसार निधी मंजूर करण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे कोणताही अतिरिक्त वित्तीय बोजा पडणार नाही. 2018-19 या वर्षासाठी 143.604 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

यामुळे राज्यातल्या सर्व दुर्बल घटकातल्या ग्रामीण कुटुंबाना म्हणजे सुमारे दोन तृतीयांश कुटुंबाना विहित कालावधीत या अंतर्गत आणता येणार आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत जम्मू काश्मीरमधल्या सर्व विभागाचा समावेश होऊन सामाजिक समावेशकता,उपजीविकेसाठी प्रोत्साहन मिळून राज्यात दारिद्रय निर्मूलनाला मदत होणार आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे आणि अशांत स्थितीमुळे राज्यात मे 2013 मधे मंजूर झालेले विशेष पॅकेज पूर्णतः लागू करण्यात आले नव्हते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email