डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०९ :- डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली आहे . या घटनेत कंपनीतील एक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती समजू शकलेली नाही. कल्याण – शिळ मार्गावरील क्लासिक हॉटेलसमोर ही कंपनी आहे.
हेही वाचा :- गडकिल्ले भाड्याने दिल्यास माझ्याशी गाठ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे
दरम्यान स्फोट झाल्यानंतर या कंपनीत आगही लागली होती. मात्र अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. या स्फोटाच्या घटनेनंतर डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपन्या आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आहे.
सडको पर आवारा जानवरों की हिंसक करतूत
Please follow and like us: