Ulhasnagar ; भाजप नगरसेविकेच्या पतीने मागितली १ कोटीची खंडणी
उल्हासनगर दि.०६ :- उल्हासनगर महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मीना सोंडे यांचे पती दीपक सोंडे आणि त्यांच्या अन्य चार साथीदारांच्या विरोधात नरेश रोहिरा या व्यापाऱ्यांकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिललाइन पोलिस ठाण्यामध्ये दीपक सोंडे आणि त्यांचे चार साथीदार अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :- कल्याण-डोंबिवली शहरात मंगळवारी पाणी नाही
उल्हासनगर कॅम्प नं-५, सेक्शन ३५ येथील कार्यालयासमोर नरेश रोहरा ३ जानेवारी रोजी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उभे असताना दीपक सोंडे याच्या चार हस्तकांनी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना एक कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर, दुपारी साडेबारा वाजता सोंडे याने मोबाइलवर फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रोहरा यांनी हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून दीपक सोंडेसह त्याच्या चार हस्तकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.