‘छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!’

Hits: 0

मुंबई दि.१२ :- “नाही धार ‘सच्चाई’ कारांच्या शब्दांना आज दिसली, ‘रोखठोक’लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली. सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली. नागू वाडीन का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली. मराठी बाणा सांगणारी सेना, सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!”, असे ट्विट करत यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

“शिवसेनेच्या नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपाची लाचारी केली आता काँग्रेसची करत आहे. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची”, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया सुरु असल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपाने राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी लोकसभेत केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी याला स्पष्ट नकार दिला.

हेही वाचा :- बहुचर्चित ठकसेन जगदीश वाघ अत्यवस्थ जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

त्यानंतर दिल्लीतील एका सभेत राहुल गांधी यांनी “माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही. मरेन मात्र माफी मागणार नाही,” असे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वच स्तरातून राहुल गांधींवर टीका होत आहेत. \राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेदेखील राहुल गांधी यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.