बिनु वर्गीस उर्फ़ काला कौआ यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
Hits: 0
खंडणी चे तीन गुन्हे दाखल असलेला बोगस पत्रकार बिनु वर्गीस उर्फ़ काला कौआ याचा अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने आज फेटाळला. यापूर्वी त्याला अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने बजावले होते.
ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये 30 जुलै रोजी पहिला गुन्हा काला कौआ त्याच्यावर दाखल झाला होता. सदर आरोपी काला कौआ याने ग्लोबल हॉस्पिटल येथील ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांना ब्लॅकमेल करून तीन लाख रुपयांची खंडणी स्वीकारली होती. याप्रकरणी केळकर यांनी कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता. पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांनी केलेल्या चौकशीनंतर खंडणी चा दुसरा गुन्हा दाखल झाला होता तर ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये खंडणी चा तिसरा गुन्हा दाखल झाला होता. महेश आहेर यांना ब्लॅकमेल करून पंधरा लाख रुपयाची मागणी काला कौआ यांनी केली होती. त्यांच्याकडून त्याने एक लाख रुपये स्वीकारले होते.
दरम्यान काला कौआ वर खंडणी चे तीन गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. कापूरबावडी पोलीस त्याला गोव्यापर्यंत शोधायला गेले होते मात्र तो सापडला नव्हता. कापूरबावडी पोलिसांनी न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट घेतले होते. सदर प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी काला कौआ ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती.16 ऑगस्ट रोजी न्यायालयाने सुनावणीदरम्यान हरकत घेतल्याने काला कौआ चे वकील गजानन चव्हाण यांनी वकीलपत्र मागे घेतले होते. त्यांनी फिर्यादी केळकर यांच्या केस मध्ये काम पाहिले असल्याने सदरची हरकत घेण्यात आली होती. या अटकपूर्व जामीन वरती ठाणे सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती गोंधळेकर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील मोराळे मॅडम आणि पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. काला कौआ यांचे वकील साळुंके यांनी न्यायालयात मान्य केले की विनू वर्गीस उर्फ काला कौआ याने खंडणी मागितली होती तो हॉस्पिटल मध्ये गेला ही खरे आहे मात्र पैसे स्वीकारल्याचे फुटेज नसल्याने त्याला अटकपूर्व जामीन मिळावा अशी मागणी न्यायालयाला केली होती.
न्यायमूर्ती गोंधळेकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेऊन अटकपूर्व जामिनाचा निर्णय राखून ठेवला होता. आज याबाबतचा निर्णय त्यांनी जाहीर केला असून आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सदर निर्णयानंतर आता पोलिसांचे पथक काला कौआ अटकेसाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.