संशोधित लघु क्षेत्र धोरणांतर्गत, दुसरी निविदा फेरी 9 ऑगस्ट 2018 पासून
नवी दिल्ली, दि.०८ – संशोधित लघु क्षेत्र धोरणांतर्गत, दुसरी निविदा फेरी ९ ऑगस्ट २०१८ ला सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान असतील.
पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने २०१६ मध्ये हे धोरण लागू केले. या अंतर्गत पहिली निविदा फेरी विक्रमी १० महिन्यांमध्ये पूर्ण झाली होती. ३४ क्षेत्रांसाठी १३४ ठेकेदारांनी बोली लावल्या होत्या. २० कंपन्यांना ३० ठेके देण्यात आले होते. त्यापैकी १३ नव्या कंपन्या होत्या.
Please follow and like us: