भरतगडच्या प्रतिकृतीस प्रथम पारितोषिक जाहीर

Hits: 0

ठाणे – ‘मी कोपरीकर फाउंडेशन’च्या वतीने समीर मार्कंडे यांनी आयोजित केलेल्या किल्ले दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये चॅलेंजर ग्रुपने उभारलेल्या भरतगड या किल्ल्याच्या प्रतिकृतीस प्रथम पारितोषीक जाहीर करण्यात आले आहे. समीर मार्कंडे यांनी ‘मी कोपरीकर फाउंडेशन’च्या माध्यमातून ठाणे पूर्व परिसरासाठी किल्ले दर्शन स्पर्धेचे आयोजन केले होते.

हेही वाचा :- कॅलिडोस्कोप विभागातल्या चित्रपटांची नावं इफ्फीकडून जाहीर

गॅझेटच्या जमान्यात किल्ले बनवण्याची कला आणि आवड लुप्त होऊ नये, यासाठी मार्कंडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. विशेष म्हणजे, या स्पर्धेचे नामांकनही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये कोपरी परिसरातील सुमारे 18 जणांनी सहभाग घेतला होता. पत्रकार संजय भालेराव, चित्रकार जितेंद्र कांबळे, शॉर्ट फिल्म दिग्दर्शक तथा ट्रेकर्स प्रसाद भुसाने यांनी या किल्ल्यांचे परीक्षण केले.

हेही वाचा :- सेल्फीच्या नादात तरुण शंभर फूट दरीत कोसळला

यावेळी खोडसावंतांनी मालवणमध्ये उभारलेल्या ठाणेकरवाडी येथील भरतगड या दुर्लक्षित किल्ल्याच्या प्रतिकृतीस प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. तर, सिद्धार्थ नगर येथील शिवनेरी किल्ल्याच्या प्रतिकृतीस दुसरे आणि वाल्मीक नगर येथील तोरणा किल्ल्याच्या प्रतिकृतीस तिसरे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. सर्व विेजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची जीवनचरित्रे, गडकिल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके देऊन गडकिल्ल्यांची सफर घडविण्यात येणार असल्याचे समीर मार्कंडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.