फ्रॉड कॉल्स, फेक लिंक व फेक मॅसेज पासून सावध रहा. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय मार्फत जनतेला आवाहन.

(विठ्ठल ममताबादे)

मुंबई दि.०४ :- कोरोना (Covid 19) च्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे घरात बसुन असलेल्या लोकांचा इंटरनेट वापर वाढला आहे. अश्यातच फेक लिंक(चुकीची व फसवणूक करणारी वेबसाईट),बँक व फायनांस कंपन्यांकडून फ्रॉड कॉल(खोटे फोन),फेक मेसेज,ऑनलाइन वस्तु खरेदी फसवणूक, अफवा यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे घरी बसलेल्या जनतेची, नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अश्या गोष्टि पासून नेहमी सावध राहावे असे आवाहन सायबर गुन्हे शाखा,पोलिस आयुक्तालय नवी मुंबई तर्फे लॉकडाऊन व संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर करण्यात आले आहे.

हेही वाचा :- संचार बंदीच्या पार्श्वभुमीवर उरण मध्ये पोलिसांचे लॉंग मार्च

प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2020 मध्ये नोंदणी करून महीन्याला 3500 रुपये देण्याचे आमिष दाखविनारी लिंक सर्वत्र फिरत आहे. या लिंक वर क्लिक केल्या नंतर प्रॉब्लेम असल्याचा संदेश मोबाईल वर येतो. ‘फ्री नेटफिक्स’ यासाठीही लिंक सर्वत्र फिरत आहे.ती 20 लोकांनी किंवा 5 ग्रुपवर पाठविल्यास फ्री नेटफिक्स मिळेल असे आमिष दाखविले जात आहे. परंतु त्यापासुन नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :- कोविड -१९: सुमारे ६ लाख फेस मास्क आणि ४० हजार लिटर हॅन्ड सॅनिटायझरची भारतीय रेल्वेकडून निर्मिती

काही सर्विस देणाऱ्या मोबाईल कंपनी कडून फ्री रिचार्ज मिळणार असे फसवे संदेश फिरत आहेत. तर काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल वर कॉल केले जातात व सांगितले जाते की ईएमआय(EMI)ची तारीख वाढवुन दिली जाईल तरी आपल्या मोबाईल वर आलेला OTP नंबर शेअर करा. असे करून नागरिकांच्या बँक अकॉउंट मधून रक्कम काढली जाते.नागरिक ऑनलाइन द्वारे विविध वस्तु इंटरनेटचा वापर करून मागवित आहेत. मात्र ऑनलाइन वस्तु मागविल्याने अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हेही वाचा :- राज ठाकरे यांच्या वक्तव्य नंतर मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण

त्यामुळे अश्या विविध खोट्या व फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या फ्रॉड लिंक, फ्रॉड कॉल, फेक मेसेज द्वारे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरु आहे.याला सुशिक्षित व्यक्तिही बळी पडत आहेत. त्यामुळे सर्वांनी अश्या गोष्टि पासून सावध राहावे फसव्या लिंक ओपन करु नये.बँकेशी संबंधित असलेला आपला OTP नंबर कोणालाही शेअर करु नये,बँक ATM संबंधित माहिती कोणालाही सांगू नये.अनोळखी ऍप्स डाऊनलोड करु नये. असुरक्षित वेब पेज तसेच वेगवेगळ्या प्लेटफॉर्मचा वापर टाळावा.संशयीत लिंक बाबत तसेच इंटरनेट वरील फसवणूकीच्या समस्या संदर्भात जनतेने www.reportphishing.in व www.cybercrime.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर तक्रार करावी असे आवाहन सायबर गुन्हे शाखा,पोलिस आयुक्तालय नवी मुंबई तर्फे करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email