शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी बंजारा समाजातर्फे भोगभंडारा
ठाणे दि.०५ :- राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटावा आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचा शिलेदार विराजमान व्हावा, यासाठी माजी खासदार तथा आ. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली भोगभंडारा करण्यात आला. राज्यात सध्या राजकीय तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा लवकर सुटावा आणि राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे, या उद्देशाने बंजारा समाजाच्या वतीने मुलुंड येथे भोग भंडारा पुजन करण्यात आले. यावेळी सेवालाल महाराजांच्या समोर होम-हवन करण्यात आले. राज्यातील शेतकर्यांची वाताहत झालेली आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
या शेतकर्यांना साह्य करण्यासाठी शिवसेनेचे सरकार सत्तेवर यावे, असे गार्हाणे यावेळी घालण्यात आले. या प्रसंगी हरिभाऊ राठोड यांनी सांगितले की, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची पिके नष्ट झालेली आहेत. या शेतकर्यांना न्याय देण्यासाठी शिवसेनेचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा भोगभंडारा आयोजित करण्यात आला होता. बंजारा समाजाने मिशन मुख्यमंत्री हे धोरण राबविले होते.
हेही वाचा :- मच्छिमारांनी समुद्रात जावू नये ; पर्यटकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे आपतकालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना
त्यानुसार, शिवसेनेच्या हाती सत्तेचा रिमोट दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, ही आमची अपेक्षा आहे. म्हणूनच आम्ही संत सेवलाल महाराजांना साकडे घातले आहे. संत सेवालाल महाराजांकडे आम्ही साकडे घातले की, महाराष्ट्रातील शेतकरी हवालदील झाला आहे. या शेतकर्यांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे सरकार लवकरात लवकर स्थापन व्होवो. यावेळी जगदीश शेट्टी, विभा परमुख, प्रदीप यादव, जीवन राठोड, सौरभ श्याम चव्हाण, आप्पासाहेब, पंडीत शेळके, रामू पवार, संतोष केनगे, रामदास राठोड, रवी राठोड आदी उपस्थित होते.