डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिना बंद
डोंबिवली दि.०३ – मध्य रेल्वेने मोठया सख्येने प्रवासी संख्या असलेल्या रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जिने बसवले असून डोंबिवली पूर्वेला पाच वर्षापूर्वी स्वयंचलित जिना बसवला आहे. मात्र हा जिना वांरवार बंद पडत असतो ज्येष्ठ नागरिक, महिला नाराजी व्यक्त केली आहे. गेला महिनाभर हा जिना अधूनमधून सुरु असतो व बहुसंख्यवेळ तो बंदच पडत असतो. मात्र गेले आठ दिवस जिना बंद असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे प्रवासी त्रस्त असून अजून आठ दहा दिवस तरी हा जिना बंदच रहाणार आहे यामुळे प्रवाशांना त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे. या संदर्भात चौकशी केली असता स्वयंचलित जिन्याची चेन बंद पडली असून यामुळे जिने बंद असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :- डोंबिवलीतील टिळकनगर प्रभागातील अंतर्गत रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे फलक
पाऊस व धूळ यामुळे जिने सरकवणारी चेन बिघडत असल्याचे कर्मचारी सांगतात. रेल्वेने मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिन्याचे कंत्राट जॉन्सन कंपनीला दिले आहे. कर्मचार्यानी दिलेल्या माहितीनुसार स्वयंचलित जिन्याला एकूण ९४ पायऱ्या असून त्या सर्व काढून ठेवण्यात येणार असून नंतर चेन व मशिन बदलण्यात येणार आहे कर्मचार्यानी डोंबिवलीतील रेल्वे अधिकार्याकडे ९४ जिने ठेवण्यासाठी जागेची मागणी केली आहे. आताचे जिने जमिनीलगत असून यामुळे त्यात धूळ व पावसाचे पाणी जाते व चेन गंजते अशी माहिती कर्मचार्यानी दिली. यासदर्भात डोंबिवली रेल्वे स्थानकाचे प्रबंधक के. ओ. अब्रहम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, स्वयंचलित जिने पुन्हा सुरु होण्यासाठी आणखी आठ दहा दिवस लागण्याची चिन्हे आहेत हे काम रेल्वेने जॉन्सन कंपनीला दिले असून कर्मचार्यानी ९४ जिने ठेवण्यासाठी जागेची मागणी केली असून ती जागा त्याना देण्यात येईल व काम जेवढे लवकर करता येईल तेवढे कसे होईल याकडे लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात.