६,००० कोटी रुपयांच्या अटल भूजल योजनेला जागतिक बँकेची मंजुरी
नवी दिल्ली, दि.०३ – देशातील भूजल पातळी टिकविण्यासाठीच्या अटल भूजल योजनेला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी ६,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातला ५० टक्के खर्चाचा वाटा भारत सरकार उचलणार आहे तर उर्वरित ५० टक्के रकमेचा वित्त पुरवठा जागतिक बँक करणार आहे. ही योजना २०१८-१९ ते २०२२ – २३ या पाच वर्षांच्या अवधित राबवली जाणार आहे.
महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात ही योजना राबवली जाईल. जलस्रोत राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
Please follow and like us: