२६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण
मुंबई दि.१८ :- येत्या २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. भारतात कर्नाटकचा काही भाग, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडच्या राज्यात अरुंद मार्गिकेत हे ग्रहण सूर्योदयानंतर पाहता येईल. उर्वरित देशभरात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल.
हेही वाचा :- रिपाइं (इंदिसे) ची नागपुरात उग्र निदर्शने
दक्षिण भारतात कन्ननूर, कोईम्बतूर, कोझीकोडे, मदुराई, मेंगलोर, उटी, तिरुमलापल्ली आदी भागात हे ग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसेल. बंगलोर मध्ये सुमारे ९० टक्के, चेन्नईत ८५, मुंबईत ७९ टक्के, कोलकात्यात आणि दिल्लीत ४५ टक्के स्वरुपात पाहता येईल. सकाळी ८ वाजता खंडग्रास ग्रहणाला प्रारंभ होईल. सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी स्थिती पाहता येईल.
हेही वाचा :- डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा बळी
कंकणाकृती सूर्यग्रहण १२ वाजून २९ मिनिटांनी समाप्त होईल. खंडग्रास सूर्यग्रहण १ वाजून ३६ मिनिटांनी समाप्त होईल. २१ जून २०२० रोजी भारतातून पुढील सूर्यग्रहण पाहता येईल. हे देखील कंकणाकृती सूर्यग्रहणच असेल. ग्रहणाचे कंकणाकृती स्वरुप भारताच्या उत्तर भारतातून दिसेल. देशाच्या उर्वरीत भागात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल.