रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल व जूनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

उरण दि.०५ :- उरण रोटरी एज्यूकेशन सोसायटीच्या रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व जूनिअर कॉलेजचा ३० वा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम रोटरी एज्यूकेशन सोसायटीच्या रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व जूनिअर कॉलेजच्या मैदानावर बोरी उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी, डॉ हितेंद्र पाटिल-सर्जिकल ऑन्कोलॉजी लंडन,नगराध्यक्ष सायली म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा संस्थापक विश्वस्त स्वर्गीय सुभाष देशपांडे यांना २ मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहन्यात आलि. संस्थेचे विश्वस्त यतिन म्हात्रे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि शाळेला असलेल्या अडचणी आमदारां समोर मांडल्या.

हेही वाचा :- मातोश्रीबाहेरुन पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

अक्षता घरत, प्राचार्य यांनी शाळेचा वार्षिक अहवाल पालकां समोर मांडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोटरी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष शेखर म्हात्रे यांनी भुषविले.रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व कॉलेजच्या मुलांना संपूर्ण वर्षामध्ये केलेल्या प्रगती नुसार बक्षिस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षभरात नेत्रदिपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक कर्मचारी वर्गांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

हेही वाचा :- Kalyan ; घरासमोरील बांबू काढण्यास रोखल्याने बेदम मारहाण

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेखर म्हात्रे यांनी शाळेचा इतिहास, शाळेची प्रगती कशी झाली, आलेले अनुभव आपल्या मनोगतात सांगून पालक-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.संस्थेचे सेक्रेटरी विकास महाजन यांनी उपस्थित मान्यवर, प्रतिष्टित नागरिक, प्रमुख पाहुणे, पत्रकार,पालक वर्ग यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास रोटरी एज्यूकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रसन्नकुमार,नरेंद्र पडते, डॉ बी व्ही देवणीकर,जगदीश पाटिल पालक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष सावंत मॅडम व सदस्य उपस्थित होते. उरण शहरामध्ये एक उत्तम व आधुनिक शाळा म्हणून रोटरी स्कूल प्रगती करित आहे. याची जाणीव ह्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने उरणकरांना मिळाली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email