ऐन सुट्टीच्या काळात क्रीडा संकुल बंद बुधवारी घरडा सर्कल येथे रस्त्यावर व्यायाम
डोंबिवली दि.१९ – २९ एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान यंत्र ठेवण्यासाठी क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडागृह दोन महिने वापरले जाणारे आहे म्हणून तरण तलाव व्यायामशाळा ऐन सुट्टीत बंद करण्यात येणार आहे याचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी उद्या बुधवार 20 मार्च रोजी व्यायामपटू घरडा सर्कल येथे रस्त्यावर व्यायाम करून निषेध करणार आहेत. या संदर्भातले सर्व प्रथम बातमी “सामना “ने प्रसिद्ध केली होती व खेळाडूच्या नाराजीला वाचा फोडली होती. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे विधानसभा संघटक कैलास शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नाराजी दर्शवली होती व खेळाडूच्या भावना व्यक्त केल्या होत्या. लोकसभा निवडणूक आचार संहिता ते मतदान होईपर्यंत दोन महिने व्यायामशाळा व तरण तलाव बंद ठेवण्याचे फर्मान काढले.
हेही वाचा :- नागरी संरक्षण दलचे रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवक हरेश्वर ठाकूर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित ..
या मुळे खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी दर्शवली आहे. या संदर्भात कैलास शिंदे यांनी सांगितले की ऐन सुट्टीत खेळाडूंना खेळण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी मिळणार नाही या काळात मोठ्या संख्येने खेळाडू तलावात व व्यायाम शाळेत प्रवेश घेतात व त्याच काळात दोन महिने या वास्तू बंद करणे खेळाडूंवर अन्यायाचे आहे यामुळे त्याच्यात असंतोष निर्माण झाला आहे. मतदान सपल्यानंतर मतदान पेट्या बंदिस्त क्रीडा संकुलात न ठेवता बाजूला असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ठेवल्यास ते अधिक सयुक्तिक होईल कारण फुले नाट्यगृह सर्व बाजूनी बंदिस्त आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले व याचा गंभीरपणे विचार करावा अशी मागणी केली आहे या बाबत आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान उद्या (बुधवार,20 रोजी )सकाळी 8 वाजता सर्व व्यायामपटू घरडा सर्कल येथे रस्त्यावर व्यायाम करून प्रतिकात्मक निषेध करणार आहेत तसेच गरज पडली तर आगामी लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे
Please follow and like us: