संतापजनक : शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर सात वर्षे बलात्कार

नगर – शाळेत नववीत शिकत असल्यापासून लग्नाचे आमिष दाखवून तसेच कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देऊन गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने गावातील मुलीवर अत्याचार केला. तसेच खोटे लग्न करून मारहाण व छळ केल्या प्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींने म्हटले आहे की, मी सहावीमध्ये शिकत असताना गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रवीकिरण भास्कर भोजणे बरोबर ओळख झाली. मी नववीत असताना ३१ ऑगस्ट २०१२ रोजी दुपारी २.३० वाजता मी घरी जात असताना मला बोलावून घेतले तुझ्या चुलत भावाची पालक म्हणून सही करण्यासाठी शाळेत बोलावले मी शाळेत गेले असता मला एका खोलीत नेऊन खिडक्या व दार बंद केले व जबरदस्तीने बलात्कार केला व सदर प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारीन तेव्हा पासून १४ जुलै २०१६ पर्यंत सतत धमकी देत सतत शाळेत व गावातील खोलीवर बोलावून घेत अत्याचार केला बदनामी होऊ नये म्हणून मी सहन केले. 

हेही वाचा :- गोडावून मध्ये चोरी – डोंबिवलीमधील घटना

माझे १५ जुलै २०१६ मध्ये लग्न जमले तू लग्न करू नकोस मी तुझ्याशी लग्न करतो अन्यथा हा प्रकार सर्वाना सांगेन, अशी धमकी देत होता. असे असतानाही १८ डिसेंबर २०१६ लग्न झाले. भोजणे याने नवर्‍याला व सासऱ्याला सर्व प्रकार सांगेन म्हणून सतत फोन करून दम दिला. आई वडिलांची बदनामी होऊ नये म्हणून मी घटस्फोट घेऊन हळगांव येथे राहू लागले १६ ऑगस्ट २०१७ रोजी मला पुण्यात शिकण्यासाठी पाठवले व एमपीएससीचे क्लास लावतो म्हणाला. तो पुण्यात येऊन लॉजवर नेऊन २७ ऑगस्ट २०१७ पासून दोन महिने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. माझी मासिक पाळी बंद झाल्याने शिरूर येथे डॉक्टरांकडे जाऊन गर्भनिरोधक गोळ्या खाण्यासाठी दिल्या. 

हेही वाचा :- कल्याण ; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला

त्यानंतर २९ जानेवारी २०१८ पासून श्रीगोंदे येथील लॉजवर २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ठेवले तेथेही अत्याचार केला. १ एप्रिल २०१८ रोजी कर्जत येथील लॉजवर ठेवले व अत्याचार केला व पुन्हा गर्भनिरोधक गोळ्या खाण्यासाठी दिल्या. नंतर जामखेड येथे एका खोलीवर ठेवले माझ्याशी लग्न कधी करतो तू माझा सतत उपभोग घेतोस सतत लग्नाचा तगादा लावल्याने १८ जुलै २०१८ रोजी स्वयंवर मंगल कार्यालय आळंदी येथे नेऊन लग्न केले. नंतर जामखेड येथे आम्ही एकत्र राहू लागलो. तो मला सतत मारहाण करू लागला. गळा दाबून तुला जीव मारीन, तुझा माझा काही संबंध नाही मी तुझ्याशी खोटे खोटे लग्न केले आहे. मला विसरून जा माझ्या वाट्याला गेली तर तुला जिवंत सोडणार नाही. लग्नाच्या आमिषाने माझी फसवणूक केली आहे. दिनांक ३१ ऑगस्ट २०१२ पासून २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत सहा वर्षे रवीकिरण भास्कर भोजणे, याने मला वेळोवेळी हळगांव येथील कापसे वस्ती शाळेत, हळगाव येथिल खोलीवर तसेच पुणे, श्रीगोंदे, कर्जत येथील लॉजवर नेऊन वेळोवेळी अत्याचार केला ब्लॅकमेल करून बदनामी करून मला सोडून देऊन माझी फसवणूक केली आहे, अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला काल दाखल करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email