दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा बंद करण्याचे आदेश
म विजय
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेकरूंना परतण्याचे आवाहन जम्मू-काश्मीर सरकारकडून करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रेवर असलेल्या भाविकांनी शक्य तितक्या लवकर निघून यावे, अशी विनंती प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. ४ ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा मार्ग बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
हेही वाचा :- हाजुरी, लुईसवाडी परिसरातील नागरिकांना आजपासून मिळणार प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी खात्रीशीर माहिती दिल्यानंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. सुरक्षादलांकडून अमरनाथ यात्रेकरूंवर होणारा हल्ला परतवून लावण्यात आला आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
bhojpuri Film Actresses Akshara singh and Pawan Singh का विवाद बढ़ा, मामला पुलिस थाने
Please follow and like us: