ठाण्यात सर्व शाखा डाक घरांचा महामेळावा संपन्न
(म.विजय)
ठाणे दि.०९ – डाक विभागाने शनिवार, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी शोभा मधाळे, पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांच्या उपस्थितीत, ठाणे विभागा अंतर्गत येणाऱया सर्व शाखा डाक घरांचा महामेळावा मराठी ग्रंथ संग्रहालय, स्टेशन रोड, ठाणे येथे संपन्न झाला. सदर महामेळाव्याला सर्व शाखा डाक पाल व डाक वितरकांची तसेच पोस्ट मास्टर उपस्थित होते. या मेळाव्यात 11000 (SB/RD/TD/SSA/IPPB) नवीन खाती उघडली गेली. तसेच 6 करोडचे RPLI/PLI प्रस्ताव काढले गेले. एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्दिष्टाने हा महामेळावा आयोजित केला होता.
हेही वाचा :- डोंबिवली ; बेकायदेशीरपणे गर्भपाताची औषधे विक्रणारे त्रिकुट गजाआड
कारण पोस्ट खात्याचे ध्येय आहे `जेव्हा गावे होतील सुरक्षित तेव्हा देश होईल विकसित.’ खात्याच्या सर्व योजनांची माहितीही येथे उपलब्ध होती. तसेच पोस्ट मास्टर जनरल नवी मुंबई क्षेत्र यांनी सर्वांशी संवाद साधला. या महामेळाव्याच्या निमित्ताने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त खाती मिळवून देणाऱया नूतन बसवंत, खुटघर शाखा डाकपाल यांचा सत्कार करण्यात आला व रोख रक्कम 10,000 चे बक्षिसही देण्यात आले. तसेच पोस्ट खात्याला सर्वात जास्त खाती व विमा रक्कम मिळवून देणाऱया शाखा डाकपालांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.