अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कल्याण शहर दिवाळी शिबिर

Hits: 0

कल्याण दि.०६ :- दिनांक ३ व ४ नोव्हेंबर रोजी हिंदू सेवा संघ, मामनोली, कल्याण येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कल्याण शहर तर्फे दिवाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नारायण सुरोशी(पत्रकार/पूर्वकार्यकर्ते), ए.ड.सौ. मिनल वैद्य (वकील/पूर्वकार्यकर्त्या) शिबीर प्रमुख सिमरन दराडे, आणि कल्याण शहरमंत्री अमोल शिंदे यांच्या हस्ते झाले.शिबीराचे प्रास्ताविक शिबीर प्रमुख सिमरन दराडे हिने मांडले. या शिबिरामध्ये वाद-विवाद स्पर्धा,टीम बिल्डिंग, जंगल भ्रमंती,सांस्कृतिक कार्यक्रम, कॅम्प फायर तसेच विविध खेळ घेण्यात आले.

ताज्या बातम्यां साठी आताच whatsapp grup join करा एक क्लिक वर

SWOT Analysis द्वारे दीपक त्रीपाठी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भीतीचे, अडचणींचे व आव्हानांचे उत्तर संधी मधून कसे शोधावे याचे मार्गदर्शन केले.

स्वा. सावरकर या विषयावर मशाल सत्र शुभम गोवेकर (जिल्हा महाविद्यालय प्रमुख) यांनी घेऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती ही सावरकरांसारखी असली पाहिजे असे त्यांनी सांगितले. यानंतर जीवन संवर्धन फौंडेशन चे अध्यक्ष सदाशिव चव्हाण यांनी मुलाखत घेण्यात आली.

हेही वाचा :- डोंबिवलीमध्ये “वनराई” ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन

बेघर मुलांसाठी चालणाऱ्या प्रकल्पाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. अशी प्रेरणा त्यांना सामाजिक काम करत असताना तसेच विद्यार्थी परिषदेच्या कामामुळे मिळाली हे सांगतानाच समाज जीवनाचा अनुभव हा विद्यार्थी परिषदेच्या कामांमध्ये आपण नक्की घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कल्याण जिल्हा संघटनमंत्री प्रेरणा पवार यांनी या शिबिराचा समारोप केला. शिबिराला एकूण ५ विद्यार्थिनी आणि 20 विद्यार्थी असे 25 शिबिरार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.