अजित पवार गुरुवारी डोंबिवलीत
माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमाला डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे गुरुवारी डोंबिवलीत येणार आहेत.
हेही वाचा :- डोंबिवली ; नियमाचे उलंघ्घन करणाऱ्या रिक्षाचालकांना पकडून पोलिसांच्या ताब्बात द्या
या नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. या प्रसंगी जगताप यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. एक तपाहुन अधिक काळानंतर अजित पवार, जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डोंबिवलीत जाहीर कार्यक्रमाला येत आहेत. डोंबिवली पश्चिमेला असलेल्या भागशाळा मैदानात २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सदर सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.