आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने दिला सिड़कोला सावधानतेचा इशारा
Hits: 1
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.१० :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अंतर्गत 10 गावातील प्रकल्पबाधित शेतकरी 23 डिसेंबर 2019 पासून ते आजतागायत अठरा दिवस होऊनही शासन व सिडकोने कोणतीही सकारात्मक भूमिका दर्शवलेली नाही तसेच शासनाच्या धोरणाप्रमाणे “आधी पुनर्वसन मग प्रकल्प ” या धोरणाविरुद्ध सिडकोने आधी प्रकल्प आणि पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला नाही.सिडकोने जाणून बुजुन हा प्रश्न भीजत ठेवत येथील स्थानिक, बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे.
हेही वाचा :- जेष्ठ नागरिकांच्या मूक आंदोलनासह राबवली सह्यांची मोहीम
ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या बाबतीत सिडको जाणून बुजुन चालढकल करत असल्याने अगोदरच संतापलेल्या ग्रामस्थ प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात निषेध व्यक्त करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर काही सामाजिक संघटनांनी थेट मुख्यमंत्री व संबंधित शासकीय विभागांना कायदेशीर लेखी पत्रव्यवहार करून प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे प्रश्न त्वरित सोडवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सिड़कोला व अन्य विभागांना थेट इशारा दिला आहे. नवी मुंबई प्रकल्पबाधितांसाठी लढना-या आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने विविध प्रशासकीय ठिकाणी कायदेशीर पत्रव्यवहार करून मागण्यांच्या पुर्ततेसाठी पत्रव्यवहार केला आहे .समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या संस्थेने दिला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या खालील प्रमाणे
1.शून्य पात्रता व अपात्र पद्धत बंद करून सरसकट सर्वांना पुनर्वसन पॅकेट लागू करा .
2.जोपर्यंत सिडको प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे बांधकाम तोडू नये .
3.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या व्यावसायिकांना 2013 च्या कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी.
4.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देऊन अठरा वर्षावरील सर्व युवक व युवतींना नोकऱ्या उपलब्ध करून देणे.
5.जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे घर बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत बाजारभावाप्रमाणे घर भाडे मिळणे .
6.अ ब क ड घरांचे स्वतंत्र प्लॉट घरभाडे निर्वाह भत्ता व कृषी मजुरीचे स्वतंत्र कुटुंब म्हणून वाटप करावे .
7.साडेबारा टक्के चे वाटप होण्याबाबत वाडी बांधकाम खर्च रुपये 2500 रुपये मिळावे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांच्या सर्व मागण्या रास्त आहेत .कारण कोपरखैरणे येथील माथाडी बांधवांना घरे सिडकोने त्यांच्या कोणत्याही ही जमिनी व घरे संपादित न करता त्यांना घरे दिलीत.त्यांना घरे दिलीत मग येथे नवी मुंबई ची स्थापना, एम.आय.डी.सी , नैना,कॉरिडोर रोड आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तर शेती बरोबर आमचे राहते घरी सुद्धा या प्रकल्पासाठी आणि देशाच्या विकासासाठी दिलीत आणि आम्ही शंभर टक्के भूमिहीन झालोत .तरीसुद्धा आमच्या स्थानिकांचे घरे शून्य पात्रता आणि अपात्र असे कोणते निकष सिडको लावते. ज्या भागात कोणतेही प्रकल्प येतात तेथील स्थानिकांना त्या प्रकल्पातील प्रशिक्षण देणे व ज्या नोकऱ्या उत्पन्न होतील. त्यात स्थानिकांना समाविष्ट करणे असे शासनाचे धोरण असून सुद्धा प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पात नोकऱ्या मिळणार नाहीत हे सिडकोचे विधान देशासाठी तयार होणाऱ्या भावे पेढी साठी खूपच घातक व धोकादायक आहे.
हेही वाचा :- भगव्या दौडमध्ये खड्ड्यांचे अडथळे सत्ताधारी पक्षाच्या शाखाप्रमुखाची तक्रार दाखल
सिडकोने प्रकल्पग्रस्तांना घरे बांधण्याचे अर्थसहाय्य म्हणून पंधराशे रुपये स्क्वेअर फिट रक्कम दिली आहे ते अतिशय तुटपुंजा आहे. म्हणून वाढीव भाव तर सकट पंचवीस रुपये स्क्वेअर फूट मिळणे हे खऱ्या अर्थाने न्यायिक होईल व 1970 सालापासून सिडकोने आमच्यापेक्षा जमिनी घेतल्या व आजपर्यंत काही जणांना गेली 40 वर्षात देखील अद्याप कोणताही मोबदला मिळालेला नाही ही बाब येथील प्रकल्पग्रस्तांवर,ग्रामस्थांवर एक प्रकारे अनायकारक आहे.असे करून सिडकोने येथील स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांचा अपमान केला आहे.असे मत रूपेश धुमाळ यांनी पत्रव्यवहाराद्वारे व्यक्त केले आहे. जर समस्या त्वरित सुटल्या नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रूपेश धुमाळ यांनी दिला.