‘आरे’तील 2700 झाडांच्या कत्तलीविरोधात युवासेनेनंतर मनसेचे अमित ठाकरे आरेच्या मैदानात
मुंबई दि.१८ :- मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील २७०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला. रविवारी हजारो मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन याचा निषेध केला, ज्याला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूसह अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला. यानंतर आता अमित ठाकरेही आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढे आले.
हेही वाचा :- पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने ठाणे रेल्वे स्थानकात मोफत स्वयंचलित रक्तदाब तपासणी सेवा सुरू
मेट्रोच्या कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्ष कापले जाऊ नयेत, यासाठी शिवसेना, मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आज (रविवार) शर्मिला ठाकरे व अमित ठाकरे देखील आरेमधील वृक्ष कापण्याचा विरोध करत आझाद मैदानामध्ये करण्यात येणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले.