नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा 12 ते 15 मार्च दरम्यान ब्रिटन भेटीवर
नवी दिल्ली, दि.११ – नौदल प्रमुख आणि सशस्त्र दलांच्या तिन्ही विभाग प्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष ॲडमिरल सुनील लांबा 12 ते 15 मार्च 2019 दरम्यान ब्रिटनला अधिकृत भेट देणार आहेत. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध संरक्षण मंचांमुळे परंपरागत सौहार्द असणाऱ्या भारतीय नौदल आणि शाही नौदल यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले आहेत.
हेही वाचा :- जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांची पत्रकारपरिषद
भारत-ब्रिटन संरक्षण सल्लागार गट (डीसीजी) आणि 1995 मध्ये स्थापन झालेल्या लष्करी उपगट (एमएसजी) मुळे सहकार्याची द्विस्तरीय संरचना तयार झाली आहे. भारतीय नौदल आणि शाही नौदल हे हिंद महासागर नौदल सामरिक क्षेत्रातील भागीदार आहेत. KONKAN या द्वैवार्षिक नौदल कवायती दरवर्षी आलटून पालटून भारत आणि ब्रिटनच्या किनारपट्टीवर घेण्यात येतात. आपल्या तीन दिवसांच्या ब्रिटन भेटीत ॲडमिरल लांबा ब्रिटनचे लष्करप्रमुख तसेच नौदल प्रमुखांना भेटणार आहेत. लंडन इथल्या आंतरराष्ट्रीय सैनिकी डावपेच संस्थेला ते भेट देतील.