सर्वात जास्त राग कुणाचा येतो? राज ठाकरे की नारायण राणे? आदित्य ठाकरे म्हणतात…

अहमदनगर दि.१७ :- सर्वात जास्त राग कुणाचा येतो? राज ठाकरे की नारायण राणे? असा प्रश्न प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेयांना विचारला. या प्रश्नानंतर सर्वांच्या नजरा आदित्य ठाकरे यांच्याकडे खिळल्या. मात्र, आदित्य ठाकरेंनी मोठ्या हुशारीने उत्तर देत आपली सुटका करुन घेतली. त्यांच्या उत्तरानंतर प्रेक्षकांमध्ये जोरदार टाळ्यांचा गजर ऐकू आला.

हेही वाचा :- मेडीक्विन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत कल्याणच्या डॉ. अस्मिता कुकडे ठरल्या एक्सलंट ऑरेटोर

अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरेंना कोणाचा अधिक राग येतो, राज ठाकरे की नारायण राणे? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझे वडील यांना देखील असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. यावर सर्वांना मी माफ केलं असं उत्तर उद्धव ठाकरेंकडून देण्यात येतं असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच मी माफ करण्याइतका मोठा नाही. परंतु राजकारणात राग वैगरे धरायचा नसतो. कोण कसही वागू दे मात्र आपण स्वच्छ मनाने राहिलं पाहिजे आणि वागलं पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :- शहरांवर पडलेला घाणेरडा डाग पुसण्यासाठी धडपड सुरू स्मार्ट सोसायट्यांसाठी केडीएमसीसह रोटरीचा अभिनव उपक्रम

आदित्य ठाकरे यांना कार्यक्रमातील रॅपिड फायर प्रश्नोत्तरात बायको आईच्या पसंतीची करणार की स्वत:च्या आवडीची निवडणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मला पहिलं काम करायचं असल्याचे आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. तसेच कोणाचे व्यक्तिमत्व आवडते, देवेंद्र फडणवीस की अजित पवार? या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी खऱ्या मनाने सांगायचे तर मला अजितदादांच व्यक्तिमत्व आवडते असे सांगितले.

हेही वाचा :- पहिल्या टप्प्यातील पुणे मेट्रो एप्रिलपासून धावणार

संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. यामध्ये आदित्य ठाकरेंना मुलखतकार अवधूत गुप्ते यांनी साहेब म्हटल्यावर प्रोटोकॉल लागू असला तरी माझा उल्लेख आदित्य साहेब करु नका. मला आदित्यच म्हणत जा असं आदित्य ठाकरे यांनी अवधूत गुप्ते यांना सांगितले.

हेही वाचा :- डोंबिवलीत चोरांचा धुमाकूळ

आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही तरुण आमदार एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही तरी करू इच्छितो. ज्या ज्या मिनिटाला जे गरजेचं असतं, ते केलं पाहिजे. टेन्शन बाजूला सोडून मजा करणं गरजेचं आहे. मी अनेक फेस्टिव्हल पाहिले, पण थोडं वेगळं आहे. युवा पिढी मनातले प्रश्न विचारलाय लागली आहे. आधी मंत्री, नेते समोर असल्यावर तरुणांवर थोडं दडपण असायचं. शपथविधीसाठी आईचं नाव घेणं हा माझ्यासाठी मोठा क्षण होता, याचीही आठवण त्यांनी करून दिली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email