एडिशनल सीपीनी केला “पत्रकार फाउंडेशन”च्या कार्याचा गौरव

( बालकृष्ण मोरे )

“पत्रकार फाउंडेशन”चा शुभारंभ सोहळा संपन्न

कल्याण / “जेवण दिले तर पाच सहा तास चालते, कपडे दिले तर पाच सहा महिने चलतात, घर दिले तर पन्नास साठ वर्ष चालते पण पुस्तके ही जन्मभर चालतात” असे सांगत ठाण्याचे आतरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी “पत्रकार फौंडेशन”च्या कार्याचा गौरव केला.

पत्रकारांच्या पाल्याना वह्या तसेच गणवेश वाटप व पत्रकारांच्या पाल्याना गुणगौरव समारंभात ते बोलत होते.कल्याणच्या अत्रे रंग मंदिरच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये गुरुवारी हा “पत्रकार फाउंडेशन”च्या शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला युवा नेते वैभव गायकवाड हे देखील उपस्थित होते.एडिशनल सीपीनी केला “पत्रकार फाउंडेशन”च्या कार्याचा गौरव केला.


या “पत्रकार फौंडेशन”च्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सुरवातीला दिनेश गुप्ता यांनी योगा बाबत कार्यक्रम सादर केला, या वेळी त्यांनी ध्यानधारने बाबत मार्गदर्शन केलं.

या वेळी पुढे बोलताना आतरिक्त पोलीस आयुक्त कराळे यांनी सांगितले की,”पोलीस, पुढारी व पत्रकार हे समाजाची कामे करीत असतात. पण पोलीस व पत्रकार यांचे ‘तुझे माझे जमेना व तुझ्या वाचून करमेना’ असे एकंदर नाते असते.” असे सांगत त्यांनी पत्रकार व पोलीस यांच्या संबंधा बाबत मिशीकल भाष्य केले.या “पत्रकार फौंडेशन”च्या शुभारंभाच्या कार्यक्रमात पत्रकारांच्या पाल्याना वह्या तसेच गणवेश वाटप व पत्रकारांची १०वी व १२वी पास विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला.

या वेळी पत्रकारणा पावसाळी छत्र्याचे वाटप करण्यात आले याचा लाभ कार्यक्रमास उपस्थित सर्वच पत्रकारांनी घेतला. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन पत्रकार व अँकर प्रणव भाबुरे यांनी केले.

हा “पत्रकार फाऊंडेशन”च्या शुभारंभ कार्यक्रम पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव पंजाबी यांनी आयोजित केला होता.या वेळी जेष्ठ पत्रकार दामुभाई ठक्कर यांच्या विशेष सत्कार आतरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते केला गेला. “पत्रकार फाउंडेशन”चे कार्यध्यक्ष बाळकृष्ण मोरे तसेच पत्रकार अण्णा बेटावदकर, सुदाम गंगावणे, कलीम शेख, सुनील जाधव, ऋषी चौधरी, सुभाष पटनाईक,रवी खरात, रोशन उबाळे, संतोष होळकर ,राजू काऊतकर, चेतन निर्मल, संतोष गुप्ता, विजय कोकरे, विलास भोईर, प्रमोद तांबे, महेश गीते ,ओंकारमणी आदी प्रमुख प्रकारांना बरोबरच अनेक पत्रकार व त्यांच्या पाल्यानी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email