कोपर जवळ आणखी एका तरुणांचा अपघाती मृत्यू

डोंबिवली दि.३० – मध्य रेल्वेच्या डोंबिवली कोपर रेल्वे स्थानकाच्या मध्ये मुबई कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून पडून आज सकाळी आणखी एका तरुणाचे अपघाती निधन झाले. मयत तरुणाचे नाव शिव वल्लभ गुजर (26) असे त्या तरुणाचे नाव आहे. शिव वल्लभ गुजर तरुण डोंबिवली पश्चिम रहाणारा होता व मशीद बंदर येथे तो दुकानात कामाला होता. सकाळी त्याने नेहमीप्रमाणे मुबाईकडे जाणारी जलद लोकल पकडली ,जलद ट्रेन असल्याने आत प्रवेश करणे त्याला करता आला नाही. डोंबिवलीतून जलद जाणारी ट्रेन कोपर जवळ आली असताना. त्याचा खांब क्रमांक 46 /23 जवळ त्याचा तोल जाऊन तो खाली पडला त्याच्या डोक्याला ,हात पायाला गँभीर जखमा झाली.

हेही वाचा :- dombivli; अतिधोकादायक साई सदन इमारत पाडण्याचे काम सुरू ,रहिवाशी संतप्त

वृत्त लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना समजताच ते पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व शिव गुजर यास शास्त्रीनगर रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या नातेवाईकांना हे समजताच ते हॉस्पिटलमध्ये आले व त्यांनी आरडा ओरड करून गोंधळ घातला मात्र विष्णुनगर पोलीस येताच. त्यांना गोंधळ घालणार्याना समजावून सांगितले. त्याचा मृतदेह कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला. तीन दिवसांपूर्वी कोपर जवळ सविता फकिरा नाईक (30)या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला होता. गेल्या सहा महिन्यात कोपर स्थानकाजवळ 38 जणांचा अपघाती मृत्यू झाला असून डोंबिवली कोपर व कोपर दिवा हा भाग मृत्यूचे सापळे झाल्याचे दिसत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email