12 वी विज्ञान शाखेच्या निकालांतील गोंधळा विरोधात ABVP ची निदर्शने, पुनर्मूल्यांकनाचे निकाल त्वरित लावण्याची मागणी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र तर्फे नुकतेच 12 वीं परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावला असला तरी सर्व निकाला लक्ष दिल्यास यात घसरण झालेली दिसून यएलि आहे. 12 वी विज्ञान शाखेचा निकाल यावर्षी कमी लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे प्रैक्टिकलचे गुण देण्यात आले नसल्याने त्याचा निकालावर परिणाम झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याची कबूलीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यानी फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. तसेच हे निकाल लवकर लागत नाहीत अशी स्थिति असते. बारावीं निकालांनंतर देशभरातील पुढील अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु होतील. त्यात पुढील 5-7 दिवसांत IIT, JEE ची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहेत. या प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यामुळे चुकीच्या निकालांमुळे विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी होने अशक्य असल्याने विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्व शंखा व प्रश्नाना घेवून बारावी निकाला विरोधात अभाविप ने आज राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालय, वाशी येथे आंदोलने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी बोर्डाच्या कारभारा विरोधात घोषणा देत आपला निषेद व्यक्त केला. विभागीय सहसचिव शरद खंडागळे यांची भेट विद्यार्थ्यांचे फोटोकॉपी-पुनर्मूल्यांकनाचे निकाल त्वरित लवावेत अशी मागणी केली. तसेच या गोंधळत विद्यार्थ्यांचे नुकसान न होण्याची ग्वाही त्यांनी यावेळी अभाविप शिष्टमंडळाला दिली. या आंदोलनाचे नेतृत्व अभाविप कोंकण प्रदेश सहमंत्री दर्शन बाबरे यांनी केले, तसेच नवी मुंबई परिसरातील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. आज बारावी विज्ञान शाखेच्या निकालांतील गोंधळत अभाविप ने आंदोलन करीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये, तसेच मोठ्या संख्येने येणारे फोटोकॉपी-पुनर्मूल्यांकन निकाल त्वरित लवावेत अशी मागणी विभागीय सहसचिवांकडे केली. यावेळी त्यांनी मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत निकालांत गोंधळ झाल्याचे मान्य केले, या विषयात बोर्ड योग्य ती पावले उचलित असल्याचे आश्वासन आम्हाला दिल्याचे प्रदेश सहमंत्री दर्शन बाबरे यांनी सांगितले. तसेच पुढील 2-3 दिवसांत यात सुधारना न झाल्यास अभाविप महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई मंत्री कृष्णा दुबे यांनी दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email