अबब!.. ५७१ कोटीं ३३ लाख खंडणीची मागणी,मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
( बालकृष्ण मोरे )
कल्याण : ५५१ कोटीं ३३ लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा गुन्हा मानपाडा पोलीस स्थानकात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. खंडणीची एवढी मोठी रक्कम लोढा ग्रुपच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट मागितल्या गेल्याने या “हाय प्रोफाईल” केस बाबत गुन्हा दाखल करून घेतला गेला आहे. लोढा हे सत्ताधारीच्या जवळचे असल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचे या बाबत बोलले जात आहे.
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड येथ अयोध्यानगरी, अंबिका टॉवर येथे राहणारे लोढा ग्रुपचे सिनियर वाईस प्रेसिडट (ग्राहक सेवा) सुरेन्द्रन नायर यांनी डोंबिवली मानपाडा पोलीस स्थानकात आपल्याकडे ५७१ कोटी ३३ लाखांची खंडनी मागितल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात खंडणी मागितल्या प्रकरणी विकास बागचंदका यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
या प्रकरणी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड अयोध्यानगरी अंबिका टॉवर येथे राहणारे लोढा ग्रुपचे सिनियर वाईस प्रेसिडट (ग्राहक सेवा) सुरेन्द्रन नायर यांनी मानपाडा पोलीस स्थानकात ही तक्रार नोंदवली आहे .त्यांनी दिलेल्या तक्रारीत सुरेंद्रन नायर सोमवारी नऊ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील निळजे लोढा हेवन ग्रीन पार्क येथील कार्यलयात बसलेलं असताना व्हॉट्सअप वर लोढा कंपनीची बदनामी करत ५७१ कोटी ३३ लाखांची मागणी करत पैसे दिले नाही तर कंपनी व कंपनीच्या अधिकाऱ्याना वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यात अडकून कोठडीत डांबून ठेवण्याची व जीविताची हानी पोहचविण्याची धमकीचे मेसेज पाठवल्याचे नमूद केले गेले आहे .या तक्रारी नुसार पोलिसांनी विकास बागचंदका विरोधात खंडणीची गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणी एपीआय दिलीप जाधव यांनी सांगितले की हा गुन्हा दाखल असून या बाबत पोलीस तपास सुरू आहे.
या खंडणीची प्रकरणाचा बाबत माहिती घेतली असता विकास बागचंदा यांचे लोढा यांच्या प्रकल्पात पाच सदनिका आहे.या बाबत बागचंदा यांनी “रेरा”त लोढाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.यातून बिनसल्या मुळे तडजोडी साठी ही रक्कम मागीतल्याचे या बाबत बोलले जात आहे.