ठाण्यात अहिल्यादेवी होळकरांचे भव्यदिव्य स्मारक साकारणार

शिवसेना खासदार राजन विचारे यांचे ‘धनगररत्न पुरस्कार’ सोहळ्यात समाज बांधवांना वचन

मासुंदा तलाव सुशोभीकरणादरम्यान होणार देखण्या स्मारकाचे लोकार्पण

( म. विजय )

ठाणे : समाजाला दिशा देणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांचे कार्य थोर आहे. त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून मासुंदा तलाव सुशोभीकरण कामादरम्यान येथील सध्याच्या स्मारकाचा चेहरामोहरा बदलून ठाणे शहरातील एक भव्यदिव्य स्मारक अहिल्यादेवींच्या रूपाने उभारले जाईल, असा विश्वास शिवसेना खासदार राजन विचारे यांनी आज व्यक्त केला. ठाणे जिल्हा धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या ‘धनगररत्न पुरस्कार’ सोहळ्यादरम्यान विचारे बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना धनगररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

ठाणे जिल्हा धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची मोठ्या उत्साहात साजरी करते. त्या निमित्ताने समाज बांधवांचे कौतुक करण्यासाठी मागील चार वर्षांपासून धनगररत्न पुरस्कार सोहळा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला जातो. यंदा एन. बी. मोटे (क्रीडा), डॉ. संध्या खडसे (वैद्यकीय), चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे (शासकीय), छगन पाटील (उद्योजक), ज्ञानेश्वर परदेशी (सामाजिक ), अनिल झोरे (राजकीय), चंद्रकांत दडस (पत्रकारिता), नवनाथ गोरे (लेखन-साहित्यिक), स्नेहल धायगुडे (शैक्षणिक ), शेफर्ड फॅमिली ट्रस्ट पाल परिवार (सामाजिक संस्था) या समाजातील मान्यवर व्यक्ती व संस्थेला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर,महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते अनंत तरे ,महात्मा फुले जन आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर, नगरसेवक योगेश जानकर,भाजप शहराध्यक्ष संदीप लेले, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे,धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, नानासाहेब मोटे, धनगर प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक कुरकुंडे, उद्योजक संदेश कवितके,सुरेश शिंगाडे, यशवंत सेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे,कोकण विभाग जिल्हाप्रमुख राजू बोडेकर आदी उपस्थित होते.मासुंदा तलाव सुशोभीकरण करताना सध्याच्या स्मारकाला लागूनच अम्पी थिएटरही उभारले जाणार आहे. त्यामुळे समाजाच्या लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी अम्पी थिएटरचा वापर करता येईल, असा विश्वास राजन विचारे यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर व्यक्त केला. त्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे आणि त्यांच्या टीमचेही देखण्या पुरस्कार सोहळ्याबाबत आभार मानले. पुरस्कार सोहळ्याआधी सुरेल वाद्यवृंदाच्या साथीने झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमाने धनगर समाज बांधवांना खिळवून ठेवले. यावेळी महिला व पुरुषांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यातआला होता. या माध्यमातून महिलांना पैठणी तर पुरुषांना आकर्षक बक्षीस देण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव अमोल होळकर,उपाध्यक्ष संतोष बुधे,खजिनदार अविनाश लबडे,प्रचारप्रमुख कुमार पळसे,सहसचिव तुषार धायगुडे,सहखजिनदार अरुण परदेशी,सल्लगार मनोहर वीरकर,दिलीप कवितके,सुनील राहिंज,सूर्यकांत रायकर,कार्यकारणी सदस्य प्रसाद वारे, गणेश बारगीर,दीपक झाडे,सुरेश भांड,सचिन बुधे,मंगेश गुंड,महेश पळसे,ऋषी पिसे,नामदेव चांगण,मनोज बनसोड,राजेश वारे,मनोज खाटेकर,प्रमोद वाघमोडे,प्रफुल्ल शिंदे,दादा खांडेकर,महिला मंडळ अध्यक्षा माधवी बारगीर,उपाध्यक्ष सुजाता बुधे,सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव अश्विनी पळसे,उपखजिनदार संगीता खटावकर,सल्लागार मीना कवितके,अर्चना वारे,सदस्य सूचिता कुचेकर,सुषमा बुधे,स्नेहा खटावकर,खटावकर,रतन वीरकर,सुजाता भांड,सीमा कुरकुंडे आदीने परिश्रम घेतले

धनगर भवनासाठी पाठपुरावा करणार – आ. संजय केळकर
महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर धनगर समाज वास्तव्यास आहे. या समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्वांगीण विकासासाठी अनेक वर्षांपासून धनगर भवनाची मागणी प्रलंबित आहे. याबाबत बोलताना आमदार संजय केळकर यांनी याप्रश्नी पालिकेसह जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email