हॉस्पिटल मधील थियेटर लागणारे साहित्य पुरवण्याचा व्यवसायीकाला सात लाखांना गंडा
डोंबिवली दि.२१ – हॉस्पिटल मधील थियेटर लागणारे साहित्य पुरवण्याचा व्यवसायीकाची फसवणुक केल्या प्रकरणी महत्मा फुले ;पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील त्पास सुरु केला आहे. मुंबई येथे राहणारे निलेश गोयल हे स्कॅन इन्कल नावाने हॉस्पिटलमधील ऑपरेशन थियेटरलागणारे साहित्य पुरवण्याचा व्यवसाय आहे तर कल्याण मुरबाड रोड येथे राहनारा प्रसाद गडकरी याचे याच व्यवसाया सबंधित मुरबाड रोड वर वायू सोल्युशन नावाने कार्यलय आहे.
हेही वाचा :- डोंबिवली – मंदिरातून चांदीचा मुकुट चोरणारा गजाआड
प्रसाद याच्या सांगण्यावरून निलेश याने कल्याण मधील एका हॉस्पिटल ला डिसेम्बर २०१६ ते फेब्रुवारी १७ पर्यंत तब्बल १२ लाख १३ हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य पुरवले व या सदर कामाचे बिल प्रसाद यांना सादर केले असता प्रसाद ने त्यांना या रकमेपैकी अवघे पाच लाख पाच हजार रुपये दिले उर्वरित रक्कम देण्याबाबत मागील एक दीड वर्षापासून टाळाटाळ केली .प्रत्यक्षात प्रसाद ने सबंधित रुग्णालयकडून संपूर्ण रक्कम वसूल केली मात्र नीलश यांना न दिल्याने अखेर निलेश यांनी त्याला जाब विचारला असताना प्रसाद ने तुला पैसे देणार नाही जे करायचे कर असे सांगत बघून घेण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी प्रसाद गडकरी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.