शॉर्ट फिल्म निर्मात्याला अटक
मुंबई- उपेंद्रकुमार वर्मा या निर्मात्याला त्याच्या अंधेरी येथे राहणाऱ्या नातेवाईकाच्या सलूनमधून अटक करण्यात आली आहे. हा निर्माता गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता अशीही माहिती पोलिसांनी दिली. २८ जानेवारीला क्लिप व्हायरल झालेल्या अभिनेत्रीने या निर्मात्याने आपली अश्लील क्लिप व्हायरल केल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर पोलीस या निर्मात्याचा कसून शोध घेत होते. उपेंद्रकुमार वर्माने त्याच्या ऑफिसमध्येच शॉर्ट फिल्मचे शुटिंग केले होते.
Please follow and like us: