जिमखन्याने जॉगिंग ट्रॅकची वेळ वाढवावी ,नगरसेविका सायली विचारे यांची मागणी
डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या गोग्रासवाडी प्रभागाच्या नगरसेविका सौ.सायली संजय विचारे यांनी नागरिकांच्या सुविधेसाठी डोंबिवली जिमखन्याने जॉगिंग ट्रॅकची वेळ वाढवण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी त्यांनी जिमखन्याच्या अध्यक्षांन एक निवेदनही दिले आहे.
डोंबिवलीतील बहुसंख्य रहिवासी हे मध्यमवर्गीय नोकरदार असल्याने नोकरीवरून घरी यायला त्याना रात्रीचे आठ ते साडेआठ वाजतात.परंतु रात्री ९ वाजतापर्यंत जॉगिंग ट्रॅकवर नगरिकाना चालण्याची मुभा दिली जाते.यामूळे नागरिकांना पुरेसा वेळ मिळत नाही.सर्व साधारणपणे १० ते सायं.६ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असल्याने त्यांना घरी पोहोचण्यास रात्रीचे आठ ते साडेआठ वाजतात.त्यामूळे नागरिकांच्या या समस्येचा विचार करुन जिमखान्याने ही वेळ रात्री ९ ऐवजी १० वाजताची करावी अशी विनंती नगरसेविका सौ.सायली संजय विचारे यांनी केली आहे.सदर प्रकरणी नागरिकांचा सहानभुतिने विचार करुन ही वेळ वाढवावी अशी विनंती करत याप्रकरणी जिमखान्याचे सहकार्य अपेक्षित असल्याचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.