CBSE BOARD फेरपरिक्षा महाराष्ट्रात होणार नाही…!

(म.विजय)

भिवंडी – नुकत्याच १०वी व १२वीच्या बोर्ड परिक्षा पार पडल्या, परिक्षा दरम्यान अनेक ठिकाणाहुन पेपर फुटीच्या बातम्या येत होत्या, त्यामुळे CBSE BOARD ने देश भरात पुन्हाः १०वी व १२ वी च्या फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

या संदर्भात आज सकाळीच प्रेस कॉन्फरन्समध्ये म.न.से.पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी देश भरातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील तमाम १० वी १२ वी च्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थी वर्गाला व पालक वर्गाला संबोधित केले की कोणत्याही प्रकारे भविष्यात / नव्याने होणाऱ्या फेरपरिक्षांना विद्यार्थी वर्गाने सामोरे न जावे व या संबंधित ठोस पावले उचलावित ,यावेळी राज ठाकरे म्हणाले की पेपरफुटी हे सरकारच व शिक्षण विभागाच हलगर्जी पणा आहे , सरकारच्या या चुकी करिता पालकांनी आपली कंभर वाकून घेवु नका ! व विद्यार्थ्यांनी पुन्हाः फेरपरिक्षा देवु नका. अन्यथा यापुढेही सरकार विद्यार्थी व पालकवर्गाला याच प्रमाने अमानुष वागणूक देईल

“सरकारच्या चुकीला सरकारनेच भोगावं” विद्यार्थी वर्गाला उगिच त्रास देवू नये अन्यथा परिणाम चांगले नाही होणार यावेळीस ते असही म्हणाले की “मी सदैव पालक व विद्यार्थ्यांसोबत आहे”.
त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरातील पालक व विद्यार्थी वर्गातुन स्वागत होत आहे.सदरिल CBSE BOARD फेरपरिक्षा (१० वी १२ वीच्या) फक्त “दिल्ली आणि हरियाणा” या राज्यांन पुरतीच मर्यादित असणार आहेत.
त्यामुळे देशभरातील “दिल्ली आणि हरियाणा” राज्य सोडून इतर राज्यातील व खासकरुन “महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालक” वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित इ.१० वी व (इ.१२ वी कला या शाखेचा अर्थशास्त्र) हा फेरपेपर होणार असुन येत्या १५ दिवसांत फेरपरिक्षांचे वेळापत्रक CBSE BOARD जाहीर करणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email