अण्णा हजारे यांचे उपोषण मागे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिम्बू पाणी देवून सोडविले अण्णा हजारे यांचे उपोषण
दिल्ली – दिल्ली येथील रामलीला मैदान येथे उपोषाणाला बसलेले सामाजिक कार्यक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी ७ दिवसानंतर आज उपोषण मागे घेतले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषि राज्य मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काही वेळापूर्वी हजारे यांची भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लिम्बू पाणी पाजले व हे उपोषण संपुष्टात आले.
अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्ली येथील रामलीला मैदानात उपोशणाला बसले होते.उपोशणादरम्यान त्यांची प्रकुती वारंवार ढासळत होती. या उपोषणामुळे अण्णांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले आहे.आज या उपोशणाचा सातवा दिवस होता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषि राज्य मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी संध्याकाळी रामलीला मैदान येथे हजारे यांची भेट घेतली. हजारे यांच्या जनलोकपालाच्या मागणीसह बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या असून लोकपालबाबत काही महिन्यांत अंमलबजावणीचं आश्वासन दिलं आहे. लोकपालबाबत कालमर्यादा देण्याचीही मागणी केली आहे.अण्णा हजारेंच्या मागण्यांसंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं दिलेलं पत्र अण्णां हजारेंनी मान्य केलं व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लिम्बू पाणी पाजले व हे उपोषण संपुष्टात आले.