66 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सार्वजनिक निवडणूक 2019नंतर घोषित होणार
नवी दिल्ली, दि.२७ – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची निवड स्वतंत्र आणि नि:पक्षपणे चित्रपट क्षेत्रातील मान्यवर ज्युरींमार्फत केली जाते. हे पुरस्कार दरवर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केले जातात. मात्र, यंदा 17 वी लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यातील एक राज्य चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे. चित्रपट माध्यमाचा कोणा एका पक्षाला होऊ शकणारा लाभ लक्षात घेऊन सर्व पक्षांना समान संधी कायम ठेवण्यासाठी या पुरस्कारांची घोषणा निवडणूका संपन्न होऊन आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Please follow and like us: