बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा स्थापना दिन साजरा
नवी दिल्ली, दि.०८ – बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात सीमावर्ती रस्ते संघटनेचा 59 वा स्थापना दिन आज साजरा करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही सीमावर्ती रस्ते संघटना, सीमा भागात रस्ते मार्गाने दळणवळणासाठी महत्वाची भूमिका बजावेल. उत्तरी आणि पश्चिमी आघाडीवर सैन्यदलाच्या धोरणात्मक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने रस्ते बांधणी आणि त्यांच्या देखभालीचे काम सीमावर्ती रस्ते संघटना करते. भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान यासारख्या मित्र राष्ट्रांमध्येही रस्ते बांधणीचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करते. सीमावर्ती भागात धोरणात्मक कनेक्टिविटी व्यापक करण्यासाठीच्या सरकारच्या उद्दीष्टाला अनुसरुन बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सज्ज आहे. या दृष्टीने आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक ते वित्त विषयक अधिकार सोपवण्यासह प्रक्रियाही सुलभ करण्यात येत आहेत.