50 हजार गुंतवणुकीत लाखोंचा नफा देण्याचे आमिष दाखवत 50 हजारांना घातला गंडा
कल्याण- डोंबिवली पूर्वेकडील नेहरू रोड यशोमंदिर सोसायटी मध्ये राहणारे सागर पाटील यांना गौतम जैन नावाच्या इसमाने 50 हजार गुंतवणुकीत 2 ते 5 लाख नफा कमवा असा मेसेज पाठवला .या आमिषाला बळी पडत सागर पाटील याने गौतम ला संपर्क साधला .गौतम ने सदर रक्कम एक बँक खात्यात भरणा करन्यास सांगितली.त्यानुसार सागर पाटील यांनी दिलेल्या बँक खात्यात 50 हजार रुपये भरले .मात्र त्यानंतर सागर पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नम्बर बंद असल्याचे आढळल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी त्यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us: