डोंबिवलीत बिल्डरच्या घरावर गोळीबार, सुदैवाने कोणीही जखमी नाही

डोंबिवलीत बिल्डरच्या घरावर गोळीबार, सुदैवाने कोणीही जखमी नाही
डोंबिवलीत बिल्डरच्या घरावर गोळीबार, सुदैवाने कोणीही जखमी नाही
डोंबिवली : येथील बांधकाम व्यावसायिक गीतेश पाटील यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडलीय. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याचे समोर आलय.
गीतेश पाटील हे नांदीवली येथील देसले पाडा येथे रहातात. त्यांच्या घरावर ४० ते ५० जणांनी हल्ला करून गोळीबार केल्याचे त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटलय. केजु मुंडे याला साडे तीन लाख रुपये उसने दिले होते, ते वारंवार मागून देखील तो देत नव्हता, शुक्रवारी त्याच्याशी फोनवर बाचाबाची झाली. मध्यरात्री 1 च्या सुमारास ४० ते ५० जणांनी घरावर हल्ला चढवित घरात गोळीबार केल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटलय. डोंबिवलीतील गेल्या 7/8 महिन्यात वारंवार गोळीबाराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत
Please follow and like us: