कमला मिल्स अग्नितांडव : महापालिकेच्या अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करू : मुख्यमंत्री
मुंबई : कमला मिल्स अग्नितांडव झालेल्या परिसराला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. अतिश्य दुर्दैवी अशी घटना असून महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. निष्काळजी केल्याप्रकरणी पाच अधिका-यांना निलंबीत करण्यात आलय. हॉटेल मालकावर कारवाई होणारच आहे मात्र ज्या अधिका- यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करू असेही मुख्यमंत्रयांनी सांगितलं. मुंबईतील अशा बांधकामांचे ऑडीट करण्याचे आदेश मुख्यमंत्रयांनी दिले.
कमला मिल्स अग्नितांडवात १४ जणांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेतील पाच अधिका-यांना निलंबीत करण्यात आलंय. मधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी धनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर, महाले सब इंजिनिअर पडगिरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी एस. एस. शिंदे अग्निशमन अधिकारी अशी निलंबीत अधिका- यांची नावे आहेत.