खळ्यावरील भाताच्या भाऱ्यात ३ विषारी घोणस शेतकरी कुटुंबाला फुटला घाम

कल्याण दि.२५ :- शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडून शेतातील खळ्यावर भाताचे भारे काढण्याचे काम सुरु असतानाच, एक नव्हे तर 3 विषारी साप त्या भाऱ्यात दळून बसल्याचे दिसताच शेतकरी कुटंबाचा थरकाप झाला. ही घटना कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावातील एका शेतीच्या खळ्यावर घडली आहे. भक्ष्याच्या शोधात विषारी-बिन विषारी सापांनी बदलत्या वातारणामुळे मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. गेल्या 3 महिन्यात संर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो साप पकडून जंगलात सोडले.

हेही वाचा :- Kalyan ; चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी डॉक्टरला झोडपणे पडले महागात

दोन दिवसापूर्वीच एका बिस्लरीच्या गोदामात 7 फुटाचा साप भक्ष्य शोधण्यासाठी शिरल्याची घटना घडली. तर भगीरथीनगर परिसरातील मॅरेज हॉलमध्ये विषारी घोणस सापाला सर्पमित्रांनी पकडले होते. सोमवारी पुन्हा कल्याण जवळच्या सापर्डे गावात राहणारे दादाजी पाटील यांच्या भात शेतातील खळ्यावर भाताचे भारे रचून ठेवण्यात आले होते.

या भाऱ्यातील काही पेंड्यातून भात झाडणीसाठी भाताचे भारे काढण्याचे काम सुरु असतानाच एक नव्हे तर 3 विषारी साप बाहेर पडले. आक्रमक साप पाहून भातेचे भारे टाकून शेतकरी पाटील यांच्या कुटुंबीयांनी तेथून पळ काढला.

हेही वाचा :- सकाळच्या सत्रात डोंबिवलीतून ४० लोकल सोडाव्यात डोंबिवलीकरांची मागणी

त्यांनतर पाटील यांनी भाताच्या खळ्यातील भाऱ्यात 2 – 3 अजगर घुसल्याची माहिती वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे आणि हितेश यांनी घटनास्थळी जाऊन भाताच्या भाऱ्यातून 3 अंत्यत विषारी घोणस साप शिताफीने पकडून सोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रमध्ये बंद केले. विषारी साप पकडल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या कुटूंबाने सुटकेचा नि:श्वास घेतला. या तिन्ही घोणस जातीचे अंत्यत विषारी साप असून 4 -5 फुट लांबीचे आहेत. या सापांना।कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सायंकाळी जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email