ठाणे जिल्ह्यातील शाळांना आरटीई प्रतिपूर्तीसाठी ४ कोटी मंजूर

ठाणे दि.२१ :- शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाच्या शुल्काची ठाणे जिल्ह्यातील शाळांसाठी सुमारे ४ कोटींची प्रतिपूर्तीची रक्कम शाळांना मिळणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले. शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार खाजगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक असून या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असते.

हेही वाचा :- Royal Enfield देशातून या तीन बुलेट बंद करणार?

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील प्रतिपूर्तीची रक्कम शाळांना शासनाने तातडीने द्यावीत यासाठी भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी ५ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन ही मागणी केली होती त्यावेळी शेलरांनी तातडीने निधी देण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

हेही वाचा :- मिरा-भाईंदर शहरास २४ तासाकरीता पाणी पुरवठा खंडित

मागील महिन्यात याबाबत अनिल बोरनारे यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांना तातडीने निधी वितरित करण्यात यावा यासाठी पाठपुरावा केला. आता शासनाने निधी मंजूर केला असून त्या त्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे. ही रक्कम ५० टक्के असली तरी उर्वरित ५० टक्के रक्कम तातडीने देण्यात यावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे. ही रक्कम ठाणे जिल्ह्यातील सुमारे तीनशे शाळांना मिळणार आहे

शिक्षणाधिकाऱ्यांनी निधीचे तातडीने वितरण करावे

मंजूर झालेल्या निधीचे शाळांना तातडीने वितरण व्हावे यासाठी आज भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी ठाणे जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीने शाळांना निधी वितरण करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email