कोचीन विमानतळांवरून/विमानतळाकडे जाणारी/येणारी उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे उद्‌भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवी दिल्लीतील डीजीसीए मुख्यालयात 24X7 नियंत्रण कक्ष स्थापन

नवी दिल्ली, दि.१६ – कोचीन विमानतळावरून/विमानतळाकडे जाणारी/येणारी उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे उद्‌भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 15 ऑगस्टपासून नवी दिल्लीत डीजीसीएच्या मुख्यालयात एक निमंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पुढील डीजीसीए कर्मचाऱ्यांमार्फत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.

1. ए.एक्स. जोसेफ, उपसंचालक : +91-9871007874

2. अतुल मेंडोला, उपसंचालक : +91-9999069074

3. कौशिक मुखोपाध्याय, उपसंचालक : +91-8586094546

4. ब्रिजेश कुमार सिंग : +91-9717307448

5. एक्षवाकुंदन श्रीवास्तव : +91-9990474145

केरळमध्ये पुढील दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे तसेच विमानतळ परिसरात पाणी भरल्यामुळे 18 ऑगस्टपर्यंत कोचीन विमानतळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र त्रिवेंद्रम आणि कालिकत विमानतळ सुरू आहेत. कोचीन विमानतळ पूर्वपदावर येईपर्यंत त्रिवेंद्रम आणि कालिकत विमानतळावरुन उड्डाणे होतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email