राज्यातील २०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई दि.१२ :- राज्यात आज कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १७६१ झाली आहे. कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ हजार ७७१ नमुन्यांपैकी ३४ हजार ९४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १७६१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा :- ठाणे शहरात ताप बाहयरुग्ण विभाग सुरु ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची होणार तपासणी

आतापर्यंत २०८ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ८०० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४९६४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४६४१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी सतरा लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हेही वाचा :- महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर देखील लॉकडाउन वाढणार आहे. किमान 30 एप्रिलपर्यंत राहणार

आज राज्यात १७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे १२ तर पुणे येथील २ , सातारा, धुळे आणि मालेगाव येथील येथील प्रत्येकी १ आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १७ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर तिघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १७ पैकी १६ रुग्णांमध्ये (९४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांमध्ये क्षयरोग हा आजारही होता.

हेही वाचा :- COVID-19 ; कल्याण-डोंबिवलीत १० लाखांहून अधिक नागरिकांचे सर्व्हेक्षण

कालपासून डॉ पी के सेन अतिरिक्त महासंचालक भारत सरकार यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय शीघ्र प्रतिसाद पथक पुणे येथे कोविड १९ प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेत आहे. या पथकामध्ये डॉ सेन यांच्या सोबत डॉ रोहित बन्सल, वैद्यकीय तज्ञ आणि डॉ सौरभ मित्रा भूल तज्ञ यांचाही समावेश आहे.या पथकाने मागील २ दिवसात बी जे वैद्यकीय महाविद्यालय, नायडू रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औन्ध तसेच वाय सी एम रुग्णालय,पिंपरी येथे भेट दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email