कोपर ब्रिज बंद करण्यापूर्वी ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक पुन्हा सुरु करावे

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१४ – डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा कोपर पूल धोकादायक झाल्याने दुरुस्तीसाठी येत्या २८ तारखेपासून वाहतूकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी होणार असून त्याचा त्रास डोंबिवलीकरांना होणार आहे. यासाठी ठाकुर्ली रेलवे स्थानकाजवळ फाटक होते ते ब्रिज झाल्याने बंद करण्यात आले आहे. पुन्हा पूलाचे काम पूर्ण होईपर्यत फाटक सुरु करावे अशी मागणी शिवसेनेने रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. डोंबिवलीतील कोपर येथील पूर्व पश्चिम जोडणारा पूल धोकादायक झाल्याने तो बंद करण्यात येणार असून यामुळे डोंबिवलीत मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.

हेही वाचा :- नारळी पौर्णिमा – रक्षाबंधनानिमित्‍त महापौरांकडून नागरिकांना शुभेच्‍छा

डोंबिवली वाहतूक विभागाने यासाठी जय्यत तयारी सुरु केली असून कोपर पूलाच्या दोन्ही बाजूला २.८ मीटर उंचावर ”हाईट वॅरियर” उभारण्यात येणार असून त्यामुळे जड वाहने या पूलावरुन जाऊ शकणार नाही. कोपर पूल बंद झाल्यास वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाने सुमारे 25  वॉर्डनची मागणी केली असून त्याचा सर्व खर्च, वेतन कल्याण डोंबिवली महापालिका करणार आहे. वाहतूक नियंत्रण विभागाकडे सध्याच कमी पोलीस आहेत. त्यामुळे ते शहराचे वाहतूक नियंत्रण करणार असून केवळ पूलाची वाहतूक बंद झाल्यास ठाकुर्ली येथील ब्रिजवरून  सर्व प्रकारची वाहने ये-जा करणार आहेत. त्यामुळे जादा 25 ट्राफिक वाडॅनची गरज आहे असे वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सतीश जाधव यांनी सांगीतले.

हेही वाचा :- डोंबिवली रेल्वे अपघातात आठ महिन्यात झाले 99 बळी

28 पासून कोपर पूल सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे त्यानी सांगीतले. यामार्गावरील फेरीवाले, खड्डे, गॅरेज हे सर्व हटवण्याची गरज असल्याचे मत त्यानी व्यक्त केले व तशा सूचना पालिकेला केल्याचे सांगीतले. 28 तारखेपासून पूल बंद करण्यात येत असल्याचे पत्र स्कूल बसेस, कचरा गाडया, नवीमुंबई महापालिका परिवहन विभाग या सर्वाना पत्र पठवल्याचे सांगीतले. कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे यांना विचारले असता त्यानी डोंबिवलीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वेने काही काळासाठी ठाकुर्ली येथील फाटक सुरु करावे यासाठी केवळ पूर्वेच्या बाजूला जी भिंत बांधण्यात आली ती तोडावी लागेल व वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.

काश्मीर में स्थित सामन्य करने के केन्द्र् सरकार के सार्थक प्रयास, और सफलता भी.
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook
Skip to toolbar