डोंबिवलीतील ‘फ’ प्रभाग सभापतींच्या वॉर्डात सव्वाशे खड्डे वाहनचालकांनीच खड्डे मोजले

डोंबिवली दि.१२ – खड्डयांची समस्या ही दरवर्षीची असून सातत्याने डांबरीकरण केल्याने मुळ रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळेही अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची समस्या होते. त्याचा त्रास वाहनचालकांना होतो. येथील भगतसिंग रस्त्यावर महापालिकेच्या कॉर्नरपासून ते टिळकपथापर्यंत सव्वाशे खड्डे असून त्या लहानमोठ्या खड्डयांमुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. शहरातील वाहनचालकांनीच खड्डे मोजल्यानंतर ही माहिती दिली. मानपाडा रस्त्याएवढेच भगतसिंग रस्त्यालाही महत्व आहे. परंतू कल्याण डोंबिवली महापालिका मानपाड्याच्या तुलनेत या रस्त्याच्या डागडुजीकडे तुलनेने कमी लक्ष देत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

हेही वाचा :- साथीचे रुग्ण वाढत असताना पालिकेच्या दोन्ही रुग्णालयात असंतोषाचा स्फोट होणार ?

फ प्रभाग समितीचे सभापती, शिवमार्केटचे नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या प्रभागात हा रस्ता येतो.  या रस्त्यावरुन महापालिकेच्या निवासी विभागात, तसेच कल्याण, दावडी आदी भागात जाणा-या परिवहन विभागाच्या बसेस, स्कूल बस, बहुतांशी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने, अन्य अवजड वाहनांची रात्रंदिवस वर्दळ सुरु असते. मात्र आठवडाभरापासून पडणा-या पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क होत असून वाहतूक विभागाचेही दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा :- पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी

ठिकठिकाणी ६ इंच खड्डे पडल्याने महापालिकेच्या रस्ते विभागाचे काम करणा-या अभियंत्यांची पोलखोल झाली आहे. शहरातील टिळक पुतळयाजवळचा ते मशाल चौक हा रस्ता सोडला तर एकही रस्ता धड नाही, ठिकठिकाणी डांबरी रस्त्यांवर वाहनचालकांना समस्या भेडसावत आहे. त्यामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले असून वाहनांच्या दुरुस्तिच्या खर्चात वाढ झाली आहे, अनेकांना कंबरदुखी जडली आहे. खड्डे पडले की, खडी, चिकन माती टाकण्यात येत असून त्याचा काहीही फायदा नसल्याचे उघडकीस आले आहे. पावसाच्या जोरदार सरी आल्या की खडी रस्त्यावर इतरत्र पसरत असून वाहनचालकांचे अपघात होण्याची शक्यता आहे.

काश्मीर में स्थित सामन्य करने के केन्द्र् सरकार के सार्थक प्रयास, और सफलता भी.
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook
Skip to toolbar