डोंबिवली रेल्वे स्थानकातील पूर्वेच्या दिशेचा सरकता जिना पुनः बंद बंद पडण्याची परंपरा चालूच

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१० – मध्य रेल्वेने महत्वाच्या सर्व रेल्वे स्थानकावर प्रवांशांच्या सोइसाठी सरकत्या जिन्यांची सोय केली असली तरी डोंबिवलीकरांना याचा लाभ योग्य  घेता येत नाही. आजही पूर्व बाजूचे सरकते जिने बंद आढळून आले. प्रत्येक वेळी कारणे सांगून हे जिने बंद असतात. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग व्यक्ती यांना त्रास होतो. डोंबिवली रेल्वे स्थानकावर पूर्वेला व पश्चिमेला असे दोन सरकते जिने आहेत तर दोन्ही बाजूला लिप्टची सोय आहे. म्हणजे दोन सरकते जिने व दोन लिप्ट आहेत. याचा लाभ ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग प्रवासी यांना होत असतो. या चारही गोष्टींची देखबाल दुरुस्ती करण्यासाठी एकच तंत्रज्ञ नेमण्यात आला आहे.

हेही वाचा :- चला, छान झाले, दुकानदारी बंद झाली!

अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी वापर करावा अशी अपेक्षा आहे. . सरकते जिने बंद असण्याचे कारण मात्र कर्मचारी हुल्लडबाज तरुणांवर फोडत आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत असलेले सरकते जिने पाण्यात गेले हे जिने जमिनीलगत असल्याने त्यात धूळ व पाणी जाऊन ते नेहमी बंद पडतात आता सुद्धा पूर्वेकडील जिने बंद पडण्याचा दोष मुसळधार पावसाला दिले जाते ” जिना सुरू होण्यासाठी जे ” कार्ड ”  वापरले जाते ते पाणी जाऊन बंद खराब झाले यामुळे जिने बंद पडल्याचे कारण सांगण्यात येते एकदा पूर्व व नंतर पश्चिम बाजूला असलेले सरकते जिने आलटून पालटून बंद असतात यामुळे महिला ,ज्येष्ठ नागरिक ,लहान मुले यांना त्रास होतो डोंबिवलीत दोन्ही बाजूचे जिने देखभाल दुरुस्तीसाठी एकाच कर्मचार्याकडे असून दोनही ठिकाणी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यांची मागणी होत आहे.

काश्मीर में स्थित सामन्य करने के केन्द्र् सरकार के सार्थक प्रयास, और सफलता भी.
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook
Skip to toolbar