Monsoon ; वरूणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदील

मुंबई दि.२० – राज्यात मान्सूनचं आगमन काही दिवसात होणार असलं तरी पाऊस जोर धरण्यासाठी जुलै उजाडणार आहे. कारण पावसाला जोर धरण्यासाठी हवामान अनुकूल नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. पावसाळा सुरू होवून जवळपास 20 दिवस झाले परंतु वरूण राजाने पुण्याच्या शेतकऱ्यांकडे अक्षरशा पाठ फिरवली आहे. मे महीना सुरू झाला की सर्वांना पावसाचे वेध लागतात. 23 मे ला रोहीणी नक्षत्राची सुरूवात होते आणि पाऊसाळा सुरू होतो. जुन महीन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचे आगमन होते आणि वरूण राजा जोरदार बरसल्या नंतर बळीराजा शेतकरी शेतीची मशागत करून पेरणी करतो. पण यंदा जुन महीन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी वरूणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

मागिल वर्षी कमी पाऊस पडल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात बळीराजाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. सध्या त्यांची उंची समुद्र सपाटीपासून फक्त दीड किलोमीटरपर्यंतच असल्याचं दिसतं आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वर वातावरणात सहा किलोमीटर उंचीवर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाहू लागतो. सध्या हा प्रवाह दहा किलोमीटर उंचीवर आहे. थोडक्यात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक आदर्श स्थिती तयार झालेली नाही. समजा काही दिवसांमध्ये हे प्रवाह सुरळीत झाले, तरी पुरेशा बाष्पाअभावी येत्या काही दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता कमीच आहे, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आयएमडीच्या आठवड्याभराच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात ओडिशा जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. पुढे ते मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे 24 ते 28 जून दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. आयआयटीएमच्या चार आठवड्यांच्या पावसाच्या अंदाजानुसार 27 जून ते 3 जुलैच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतरचा आठवडा कोरडा राहण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये आजमितीला केवळ 6.35 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हा पाणीसाठा 17 टक्के होता. मराठवाड्याची स्थिती सर्वात भीषण आहे. कारण इथं केवळ 0.79 टक्के पाणी धरणांमध्ये आहे. अल निनोच्या प्रभावाचं हे सलग दुसरं वर्ष आहे. त्यामुळे परिस्थिती भीषण असणार आहे.महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये आजमितीला केवळ 6.35 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हा पाणीसाठा 17 टक्के होता. मराठवाड्याची स्थिती सर्वात भीषण आहे. कारण इथं केवळ 0.79 टक्के पाणी धरणांमध्ये आहे. अल निनोच्या प्रभावाचं हे सलग दुसरं वर्ष आहे. त्यामुळे परिस्थिती भीषण असणार आहे. दुष्काळाने सर्व काही नष्ट झाल्याने शेतकऱ्यांपुढे आता पाऊसाळ्यात खरीपाचे पिक हातातून जाते की काय याचेच मोठे संकट उभे राहिले आहे.दुष्काळाने बळीराजा शेतकरी आधीच दोन ते तीन वर्ष पाठिमागे गेला आहे. उभ्या जगाचा मायबाप पोशीदा शेतकरी जगवण्यासाठी सरकारे ठोस उपाय योजना कराव्यात.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook