निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत विषय ऐरणीवर

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१७ – कल्याण डोंबिवलीचे निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना एक वर्षापूर्वी आठ लाख रुपये लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर त्याना प्रशासनाने त्याना निलंबित केले होते. या घटनेला एक वर्ष झाले असून आता येत्या 20 तारखेला होणाऱ्या महासभेत निलंबित अतिारिक्त आयुक्त संजय घरत यांची विभागीय चोकशी करण्याचा प्रस्ताव महासभेत प्रशासनाने मांडला असून या विषयावर वादळी चर्चा होऊन चौकशीला मान्यता मिळण्याची चिन्हे आहेत. माहाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम कलम 53 व 56 मधील तरतुदीनुसार संजय घरत व लिपिक ललित आमरे यांचे विरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 8  खाली विभागीय चौकशी करण्यास महासभेची मान्यता मिळण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव महासभेत मांडला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या काही वर्षात सुमारे 32 अधिकारी, कर्मचारी यांना लाच घेताना रंगेहात अटक केली होती मात्र या सर्वात सर्वात जास्त आठ लाख रुपये लाच घेताना ठाणे लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.

अतिरिक्त (निलंबित) आयुक्त घरत याना यापूर्वीही कामात टाळाटाळ केल्याबददल निलंबित करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या चार पाच वर्षात विशेषत: 27 गावात मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून सात मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करु नये म्हणून त्यानी तक्रारदाराकडे 42 लाख रुपयांची मागणी केली होती. घरत हे महापालिकेत अत्यंत वादग्रस्त अधिकारी म्हणून परिचित आहेत. ज्या सुविधा महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात नाहीत त्या त्यांनी त्यांच्या कार्यालयात करुन घेतल्या होत्या. अधिकाऱ्यांना, नगरसेवकांना कार्यालयात बोलवायचे व कार्यालयाबाहेर दोन दोन तास बसवून ठेवायचे अशा तक्रारी मोठया प्रमाणावर होत्या. राज्य शासनाने 27 गावंचे कामकाजाचं दप्तर घरत यांचेकडे सोपवले होते. पण त्यांनी शासनाच्या सुचनाकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार एका माजी आयुक्तांनी केली होती. या पार्श्वभूमिवर येत्या 20 तारखेला घरत यांची विभागीय चौकशी करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव येणार असून याविषयी महासभेत वादळी चर्चा होण्याची चिन्हे आहेत. विभागीय चौकशीला मान्यता मिळाल्यानंतर घरत पुन्हा सेवेत येतील अशी एक शक्यता असून या बद्दल दोन मतप्रवाह असून अधिकारी व नगरसेवकांचा एक गट घरत पुन्हा सेवेत इतक्यात येऊ नयेत या बद्दल प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 20 तारखेला काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook
Skip to toolbar