कार फोडणाऱ्या चोरट्या दुकलीचे मोडले कंबरडे मुंबईतील कार माफियांशी संबंध

डोंबिवली दि.१७ – रात्रीच्या वेळेत इमारतीच्या आवारात आणि रस्त्यांच्या कडेला पार्क केलेल्या आलिशान कारमधील महागडे कारटेप चोरून कल्याण-डोंबिवलीकर वाहनधारकांना घाम फोडणाऱ्या सराईत दुकलीचे कंबरडे मोडण्यात क्राईम ब्रँचला यश आले आहे. कल्याण युनीटने अटक केलेल्या या दुकलीकडून शेकडो गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून या दुकलीचा मुंबईतील कार माफियांशी थेट संबंध असल्याची माहिती देखिल हाती आली आहे. कल्याण क्राईम ब्रँच युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना एक जण चोरलेले कारटेप कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार वपोनि संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार निलेश पाटील, फौजदार नितीन मुदगुण, जमादार ज्योतीराम साळुंखे, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे, अजित राजपूत, सतीश पगारे, प्रकाश पाटील यांनी रेल्वे स्टेशन परिसरात जाळे पसरले होते. दिपक हॉटेल जवळ आलेल्या एकाला कारटेपसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने जोसेफ मरिदास दास बापू स्वामी (38, रा. बिहारनगर दिवा-पूर्व) असे सांगितले. युनिट कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता प्रथम त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्या ताब्यात मिळालेला कारटेप त्याने डोंबिवली एमआयडीसीच्या मानपाडा भागातून रात्रीच्या वेळेस कारच्या पुढील डाव्या साईटची काच फोडून चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्याच्या सोबत रात्रीच्या वेळेस पाळत ठेवणारा साथीदार मंगेश संदीप ढुमणे (24, रा. दत्तनगर डोंबिवली पूर्व) याच्याही दत्तनगर येथून मुसक्या आवळल्या.

यातील जोसेफ स्वामी याच्या दिवा येथील राहते घराची झडती घेतली असता.  तेथे वेगवेगळ्या नामचीन कंपन्याचे महागडे 12 कारटेप पोलिसांनी जप्त करण्यात आल्या. सदर दोन्ही आरोपींनी डोंबिवली, विष्णुनगर व मानपाडा पोलिस ठाण्याच्या भागातून रात्रीच्या वेळेस फोरव्हीलर गाड्यांची पुढील डाव्या साईटची काच फोडून कारटेप चोरी केल्याचे कबुली दिली. आतापर्यंत या दुकलीकडून एकूण 13 दाखल गुन्हे उघडकीस आले असून एकूण 2 लाख 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल क्राईम ब्रँचने हस्तगत केला आहे. तसेच या दुकलीचे एकूण 22 कारटेप चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचे वपोनि संजू जॉन यांनी सांगितले. यातील जोसेफ स्वामी हा रेकॉर्डवरील नामचीन कारटेप चोर आहे. त्याच्यावर यापूर्वी कल्याण-डोंबिवली परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. 

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook