शहरात भाजपा तर्फे गरीब व हुशार विद्यार्थ्याना मोफत वह्यांचे वाटप

[ राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आयोजन ]

डोंबिवली दि.१७ – गरीब विद्यार्थांना शिक्षण घेतांना शालेय साहित्यांची कमतरता भासू नये. उच्च शिक्षणासाठी अशा अडचणी येऊ नयेत म्हणून गेली अनेक वर्षे गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या आणि पुस्तकांचे वाटप हा उपक्रम स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण राबवीत आहेत. यावर्षीही त्यांचाच माध्यमांतून मोफत वह्यांचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षी पूर्व विभागातील भाजपाचे वीर सावरकर रोडवरील ‘जाणता राजा’ कार्यालय, पश्चिम विभागातील कोपरगाव अहिल्याबाई शाळा, सम्राटचौक येथील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय, गुप्ते रोड, बाळकृष्ण अपार्टमेंटमधील भाजपा कार्यालय, उमेशनगर चौक, जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड आदी सहा ठिकाणी विद्यार्थांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

मोफत वह्यांसाठी गुणपत्रिक, आधारकार्ड, रेशनकार्ड आदी कागदपत्रे विद्यार्थांकडून तपासली जात होती. मोफत वह्यासाठी प्रत्येक विभागात विद्यार्थांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सदर वह्यांचे वाटप करण्यासाठी सम्राटचौक येथे हरीश जावकर, जुनी डोंबिवली येथे कृष्णा पाटील, दीपक गावरे, कोपरगांव येथे पवन पाटील, अर्चना पावडे, निशा कबरे तर गुप्ते रोड येथे प्रदीप चौधरी, अमोल दामले आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. पश्चिम मंडल अध्यक्ष प्रज्ञेश प्रभूघाटे, नगरसेवक राजन आभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक यांनी सदर उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. 

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook
Skip to toolbar