युवापिढीचे ठाकरे-पवार एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

मुंबई दि.१५ – शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांची गुरुवारी मुंबईत भेट झाली. या भेटीमध्ये रोहित पवारांनी अमित यांना फुटबॉल स्पर्धेचे निमंत्रण दिलं. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते उघडपणे राज ठाकरेंचं कौतुक करताना दिसतात. अशातच लोकसभा निवडणुकीत मनसे आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा सुरु झाली.

आज श्री. रोहीत पवार यांची भेट झाली. 'सृजन' या संस्थे मार्फत विविध क्षेत्रात चालू असलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली….

Posted by Amit Thackeray on Thursday, June 13, 2019

अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी भाजपाविरोधात प्रचार करुन राज्यात निवडणुकीच्या वातावरणात रंगत आणली होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांना जवळ करण्यासाठी आघाडी इच्छुक आहे. ठाकरे आणि पवार घराण्यातील ऋणानुबंध नवीन पिढीही जपताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील फिनीक्स मॉलमध्ये रोहित पवार आणि अमित ठाकरेंची भेट झाली या भेटीबाबत अमित ठाकरेंनी सांगितले की, ‘सृजन’ या संस्थे मार्फत विविध क्षेत्रात चालू असलेल्या कामांची रोहित पवारांनी माहिती दिली.

' सृजन ' मार्फत वेगवेगळ्या क्षेत्रांना योग्य ते व्यासपीठ देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. यांतर्गतच सृजन क्रिकेट , सृजन…

Posted by Rohit Rajendra Pawar on Thursday, June 13, 2019

समाजहितासाठी सुरु असलेल्या त्यांच्या या कार्याला माझा नेहमीच पाठींबा असेल. आजचे तरुण कार्यकर्ते आणि राजकारण या विषयावर देखील आम्ही प्रदिर्घ चर्चा केली. राजकारणात तरुण कार्यकर्त्यांना योग्य दिशा मिळावी व एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा उंचावला जावा यासाठी आम्ही नक्कीच एकत्र काम करू असा विश्वास अमित ठाकरेंनी व्यक्त केला तसेच ‘सृजन फुटबॉल’ या स्पर्धेचे येत्या ऑगस्ट मधे आयोजन करण्यात आले आहे त्याचे निमंत्रण रोहित पवार यांनी दिले आणि मी ते स्वीकारले आहे असं त्यांनी सांगितले. तर रोहित पवार यांनी सांगितले की, अमित ठाकरे यांची भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले , ते त्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले.

फुटबॉल हा अमित ठाकरे यांचा आवडीचा खेळ असून ते स्वतः फुटबॉलचे चांगले खेळाडू देखील आहेत. फुटबॉल सोबतच तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. दरम्यान पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते जे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेविरुद्ध बाजू मांडत असतात त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी करण्याची गरज असलेल्या उपायांवर चर्चा झाली. युवक म्हणून पक्षबांधणीचे काम करत असताना आम्हाला या तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. योग्य विचारांवर चालणाऱ्या , या विचारांचे समर्थन करणाऱ्या अशा तरुणांमागे आम्ही नेहमीच खंबीरपणे उभा असणार असल्याचं रोहित पवार आणि अमित ठाकरेंनी सांगितले.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook